गडकरींच्या ‘पूर्ती’त गुंतवणूक करणार्‍या कंपन्यांचे पत्ते खोटे

November 8, 2012 9:55 AM0 commentsViews: 14

08 नोव्हेंबर

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या पूर्ती ग्रुपमधील गुंतवणूकदार कंपन्यांचे दिलेले पत्ते खोटे असल्याचं उघड झालं आहे. मुंबई इन्कम टॅक्स विभागाने याचा अहवाल पुणे इन्कम टॅक्स विभागाकडे पाठवला आहे. प्राथमिक चौकशीत कंपन्यामध्ये अनियमितता असल्याचंही आढळून आलंय. आता या कंपन्यांमध्ये पैसे कुठुन आले याचा तपास करण्यात येणार आहे. पुर्ती ग्रुपमध्ये 19 बेनामी कंपन्यांनी गुंतवणूक केल्याच उघड झालंय. या कंपन्यांनी आपले पत्ते मुंबईतील अंधेरी येथील झोपडपट्टीतले दिले होते. पण प्रत्यक्षात झोपडपट्टीत या कंपन्याना नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे बेनामी कंपन्यात पैसा कुठुन आला हा प्रश्न इन्कम टॅक्स विभागाने उपस्थित केलाय. एव्हान एवढेच नाही तर या बेनामी कंपन्यात गडकरींचे निकटवर्तीय संचालकपदावर विराजमान होते. यामध्ये गडकरींचा ड्रायव्हर, अकाऊंटट संचालक असल्याचं तपासातून उघडं झालं होतं.

close