बाळासाहेबांची प्रकृती स्थिर -संजय राऊत

November 11, 2012 4:19 PM0 commentsViews: 17

11 नोव्हेंबर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती आता स्थिर असल्याचं शिवेसनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितलं आहे. त्यांनी देशबांधवांना दिवाळीच्या शुभेच्छा पाठवल्या आहे असं राऊत यांनी सांगितलं. बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती काल रात्री चिंताजनक झाली होती. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये काळजीचं वातावरण होतं. पण आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं राऊत यांनी सांगितलं आहे. शनिवारी रात्री राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांच्या तब्येतीची विचारपुस केली. या भेटीनंतर राज यांनी माध्यमांशी संवाद साधला. बाळासाहेबांची प्रकृती स्थिर असून चिंता करण्याचं कारण नाही. विनाकारण अफवा पसरवू नका असं आवाहनही राज यांनी केलंय.

close