आबांनंतर कोण… गुरुवारी ठरणार

December 3, 2008 5:25 AM0 commentsViews: 1

3 डिसेंबर , मुंबईउपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री कोणाला करायचं, यावरून राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये मतभेद झाले. त्यामुळे आता हा निर्णय शरद पवारांवर सोपवण्यात आलाय. आर आर पाटील यांच्या उत्तराधिकार्‍याचं नाव बुधवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऑफिसमध्ये डी.पी. त्रिपाठी, प्रफुल्ल पटेल यांनी आमदारांची बैठक घेतली. या बैठकीसाठी आर आर पाटील यांना हेलिकॉप्टरनं तासगावहून मुंबईला आणण्यात आलं. बैठकीआधीच राष्ट्रवादीत पमुख्यमंत्रीपदासाठी स्पर्धा सुरू झाली होती. छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील हे या शर्यतीत उतरले होते. भुजबळ यांच्या नावाला मराठा नेत्यांना विरोध केला. त्यामुळे हा निर्णय आता पवारच घेतील.निवडणुकीला एक वर्ष उरलंय. त्यामुळे गृहमंत्रीपदावर अनुभवी नेता नेमला जावा, अशी आमदारांची मागणी आहे. मात्र, भुजबळ यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद दिलं तर ते नाकापेक्षा जड होतील, अशी भीती शरद पवारांना वाटतेय. त्यामुळे गृहमंत्रीपद अजित पवार किंवा दिलीप वळसे पाटील यांनी घ्यावं, अशी चर्चा आहे. पण राष्ट्रवादीच्या तरुण मंत्र्यांनी उपमुख्यमंत्रीपदही तरुण नेत्याकडे द्यावं, अशी मागणी केलीय. या मतभेदांमुळे आता शरद पवार यात काय निर्णय घेतात यावरच महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री ठरणार आहे.

close