सहकारमंत्र्यांपाठोपाठ दूध संचालकांचा ऊस जाळला

November 16, 2012 9:44 AM0 commentsViews: 3

16 नोव्हेंबर

पश्चिम महाराष्ट्र ऊस दराचे आंदोलन पेटले असताना बुधवारी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या शेतातील ऊस जाळण्यात आल्याची घटना घडली आहे. काही अज्ञात लोकांनी हा ऊस जाळलाय. कळाशी गावात हर्षवर्धन पाटील यांच्या शेतात जवळपास दोन एकर जागेवरील उस जाळून टाकण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहे. तर आज शुक्रवारी इंदापूर सहकारी दूध संघाचे संचालक मंगेश पाटील यांच्या शेतातील पाच एकरातील ऊस रात्री अज्ञातांनी जाळला. त्याचबरोबर कर्मयोगी साखर कारखान्याचे संचालक तुकाराम जाधव यांचे भाऊ वामन जाधव यांचाही पाच एकरातील ऊस जाळला. कर्मयोगी साखर कारखान्याचे संचालक वामन सरडे यांचाही ऊस पेटवला आहे. पोलीस पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

close