उसाचे दर कारखान्यांनी ठरवावे -मुख्यमंत्री

November 12, 2012 10:11 AM0 commentsViews: 6

12 नोव्हेंबर

एकीकडे ऊस दरासाठी आंदोलन पेटलं असताना सरकार मात्र भूमिकेवर ठाम आहे. ऊसाचा दर साखर कारखान्यांनी ठरवावा असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय. पण सरकारनं ठरवून दिलेला दर म्हणजे FRP पेक्षा कमी दर देणार्‍या कारखान्यांवर कारवाई करण्याचा इशारा ही मुख्यमंत्र्यांनी दिलाय. ते श्रीरामपूरमध्ये बोलत होते. शेती महामंडळाच्या 23000 एकर शेतजमिनीचं खंडकरी शेतकर्‍यांना वाटप करण्याचा निर्णय कोर्टाने दिला आहे. या वाटपाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्रीरामपूरमध्ये झाला.

close