मराठवाड्याला हक्काच्या पाण्यासाठी शिवसेनेचा महामोर्चा

November 9, 2012 3:24 PM0 commentsViews: 5

09 नोव्हेंबर

मराठवाड्याला हक्काचं पाणी मिळालं पाहिजे या मागणीसाठी शिवसेनेनी आज औरंगाबादमध्ये महामोर्चा काढला. गेल्या महिनाभरापासून मराठवाड्याला उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातून पाणी देण्याची मागणी होत आहे. भंडारदरा धरणातून दिलेल्या अडीच टीएमसी पाण्यापैकी फक्त 1 टीएमसी पाणी मराठवाडयाच्या वाटाल्या आले. आता मराठवाडयाला किमान 19 टीएमसीची मागणी शिवसेनेनी केलीय. मराठवाडयातील शिवसैनिकांनी एकत्र येऊन हा महामोर्चा काढला. क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे, आमदार प्रदिप जैयस्वाल, जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी होते.

close