चेतेश्वर पुजाराची शानदार डबल सेंच्युरी

November 16, 2012 9:53 AM0 commentsViews: 5

16 नोव्हेंबर

अहमदाबाद टेस्टचा आजचा दुसरा दिवसही भारतीय बॅट्समननं गाजवला. आजच्या दिवसाचा हिरो ठरलाय तो भारताचा युवा बॅट्समन चेतेश्वर पुजारा.. पुजारानं डबल सेंच्युरी झळकावली आहे. टेस्ट कारकीर्दीतली ही त्याची पहिली डबल सेंच्युरी ठरली. पहिल्या दिवसाअखेर 98 रन्सवर नॉटआऊट असलेल्या पुजारानं दुसर्‍या दिवसाच्या सुरवातीलाच सेंच्युरी पूर्ण केली. यानंतर आक्रमक बॅटिंग करत पुजारानं डबल सेंच्युरीही पूर्ण केली. पुजारानं आपल्या खेळीत तब्बल 21 फोरची बरसात केली. भारतातर्फे अवघी सहावी टेस्ट मॅच खेळणार्‍या पुजारानं मधल्या फळीत आपलं स्थान भक्कम केलंय. पुजाराला चांगली साथ मिळाली ती टेस्टमध्ये कमबॅक करणार्‍या युवराज सिंगची. युवराजनं 74 रन्सची खेळी केली आहे.

close