ऊसदरासाठी ‘स्वाभिमानी’चा तिरडी मोर्चा

November 16, 2012 10:33 AM0 commentsViews: 3

16 नोव्हेंबर

कोल्हापूर जिल्ह्यात ऊस दर आंदोलनाची धग अजून कायम आहे. 3 हजारांचा भाव मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह शेतकरी संघर्ष समिती आणि शिवसेनाही आक्रमक झाली आहे. कागलसह चंदगड गडहिंग्लज भुदरगड तालुक्यामध्ये जोरदार आंदोलनं आणि रास्ता रोको करण्यात येत आहेत. चंदगड इथं सरकारच्या निषेधार्थ तिरडी मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनात हजारो शेतकरी सहभागी झाले होते. अनेक ठिकाणी पोलिसांवर दगडफेकही करण्यात आलीय. त्याला प्रत्यत्तर म्हणून पोलिसांकडूनही लाठीमार करण्यात आला. गारगोटीजवळच्या कूर गावात काल एका कार्यकर्त्यांनं आत्मदहनाचाही प्रयत्न केलाय. तर थेरगावजवळ दूध रस्त्यावर ओतून निषेध व्यक्त केला.

close