IACच्या कार्यकर्त्यांचे अंबानींच्या घरासमोर आंदोलन

November 10, 2012 9:20 AM0 commentsViews: 6

10 नोव्हेंबर

इंडिया अगेन्स्ट करप्शनचे नेते अरविंद केजरीवाल यांनी उद्योगपतींवर आरोप केल्यानंतर आज मुंबईत इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या कार्यकर्त्यांनी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कफ परेड येथील घराजवळ सत्याग्रह आंदोलन केलं. इंडिया अगेंस्ट करप्शनचे मयांक गांधी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं होतं. यावेळी हुतात्मा चौकातल्या एचएसबीसी बँकेसमोरही निदर्शन करण्यात आली. हे आंदोलन लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी अंबानींच्या घराजवळ मोठा बंदोबस्त ठेवला आहे. स्वीस बँकांमध्ये अंबानी बंधुंसह अनेक उद्योजक आणि राजकारणी मिळून एकूण सातशे भारतीयांचा 6000 हजार कोटी काळा पैसा दडवून ठेवण्यात आलांय, असा गौप्यस्फोट अरविंद केजरिवाल यांनी शुक्रवारी दिल्लीत केला.

close