सदाभाऊ खोत यांना सातारा -सोलापुरात येण्यास बंदी

November 16, 2012 2:52 PM0 commentsViews: 124

16 नोव्हेंबर

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांना पोलिसांनी सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात यायला बंदी घातली आहे. मुंबईत दंगल होऊनही तिथे गोळीबार नाही, मग मावळ आणि सांगलीतच पोलीस का करतात गोळीबार असा सवाल सदाभाऊ खोत यांनी विचारला आहे. राजू शेट्टी यांची कारागृहातून सुटका झाल्यानंतर आम्ही आर आर पाटील यांच्या अंजनी या गावात ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती सदाभाऊंनी दिलीय. तसेच पवार काका-पुतणे जे सांगतात तेच आर आर पाटील करत असल्याचा आरोपही सदाभाऊंनी केलीय.

close