पिंकी प्रामाणिक मुलगाच

November 12, 2012 12:28 PM0 commentsViews: 5

12 नोव्हेंबर

ऍथलिट पिंकी प्रामाणिक मुलगा आहे की मुलगी यावर उठलेल्या वादळावर अखेर पडदा पडला आहे. पिंकी प्रामाणिक वैद्यकीय चाचणीत दोषी आढळली आहे. पिंकी मुलगी आहे की मुलगा हा वाद कोर्टात दाखल करण्यात आलं होतं. पण आता वैद्यकीय चाचण्यानंतर पिंकी मुलगा असल्याचं सिद्ध झालं आहे. त्यामुळे पोलिसांनी पिंकीविरोधात कोर्टात चार्जशीट दाखलं केली आहे. त्याचबरोबर पोलिसांनी पिंकीविरोधात बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हाही दाखल केला आहे. कोलकात्याच्या एसएसकेएस हॉस्पिटलमध्ये पिंकीची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली. पिंकीच्या लिव्ह इन साथीदारानं पिंकीच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पिंकीला पोलिसांनी अटक केली होती.

close