अण्णांच्या नव्या टीमची आज घोषणा

November 10, 2012 9:33 AM0 commentsViews: 2

10 नोव्हेंबर

आज दिल्लीमध्ये जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देशभरातील त्यांच्या समविचारी कार्यकर्त्यांना एकत्र बोलवलं आहे. महाराष्ट्र सदन इथं ही बैठक सुरू आहे. भ्रष्ट्राचाराविरोधातील आंदोलन कसं पुढे न्यायचं आणि या आंदोलनाला आणखी कुठल्या नवीन मुद्यांची जोड द्यायची यासंदर्भात नवीन टीम अण्णा चर्चा करणार आहे. ही बैठक दुपारी चार वाजेपर्यंत चालणार असून त्यानंतर अण्णा पत्रकार परिषद घेऊन आपल्या नव्या टीमची घोषणा करणार आहेत. अण्णा हजारेंच्या नव्या टीममध्ये किरण बेदी, मेधा पाटकर, अखिल गोगोई, अविनाश धर्माधिकारी, लेफ्टनंट कर्नल ब्रिजेंद्र, विश्वभर चौधरी असणार आहे.

close