गोवा हायवेवर खासगी बसला अपघात, 4 ठार

November 20, 2012 5:05 PM0 commentsViews: 104

20 नोव्हेंबर

रत्नागिरीजवळ मुंबई गोवा हायवेवर नीता ट्रॅव्हल्सच्या व्हाल्वो बसला आज पहाटे चार वाजता आसुर्डेजवळ अपघात झाला. या अपघातात चारजण ठार तर 17जण गंभीर जखमी झाले आहे. मृतांमध्ये एक महिला, तीन पुरुषांचा समावेश आहे. जखमींवर डेरवणच्या वालावलकर हॉस्पिटलमध्ये सुरु आहेत. जखमींपैकी चार जणांची प्रकृती गंभीर आहे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलंय. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होतेय. ही बस मुंबईहून गोव्याकडे जात होती. बसमध्ये अंदाजे 30 प्रवासी होते. हे प्रवासी मुंबई आणि गोव्याचे होते. ड्रायव्हर सुरुवातीपासूनच बस भरधाव वेगात चालवत होता अशी माहिती प्रवाशांनी दिलीय. आसुर्डेजवळ वळण न घेतल्यानं ती बस सरळ जाऊन झाडावर आदळली. त्यामुळे अपघाताची तीव्रता कमी झाली. ड्रायव्हरला ताब्यात घेण्यात आलं असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जखमींसाठी आणखी ऍम्बुलन्सची व्यवस्था करण्यात आलीय.

close