मुंबईवरील हल्ल्याची कोस्टगार्डला कल्पना होती – नौदलप्रमुख

December 3, 2008 7:13 AM0 commentsViews: 1

3 डिसेंबर, दिल्लीमुंबईवरच्या हल्ल्याची कोस्ट गार्डला कल्पना होती, असा दावा नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल सुरीश मेहता यांनी केला. मुंबई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नौदल प्रमुखांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत हे सांगितलं. कारवाईसाठी गुजरातकडे जहाज पाठवलं होतं, पण कोस्ट गार्डला पोहोचायला उशीर झाला, असंही नौदल प्रमुखांनी म्हटलंय. विशेष म्हणजे सुरक्षा यंत्रणांमध्ये अधिक चांगला ताऴमेळ हवा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे."भारताच्या आणि पाकिस्तानच्या ट्रॉलर वेगवेगळ्या असतात. पण हे अतिरेकी भारताच्या ट्रॉलरमधून आल्यामुळे आम्हाला चकवा देऊ शकल्या. आम्ही आमच्यातली ही कमी लवकरच दूर करू" असं नौदलप्रमुखांनी स्पष्ट केलं.

close