ऊस दरासाठी शेतकरी संघटनेचं मूक आंदोलन

November 16, 2012 2:58 PM0 commentsViews: 7

16 नोव्हेंबर

उसाला 3 हजार भाव मिळालाच पाहिजे अशी मागणी करत कोल्हापुरमध्ये आज शेतकरी संघर्ष समितीनं तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून मूक आंदोलन केलं. शेकापचे माजी आमदार संपतबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. आंदोलनात डाव्या पक्षातले कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी सरकारनं ऊस दराच्या तडजोडीची तारीख लवकर जाहीर करावी आणि शेतकरी संघटनेच्या नेत्यांवर दाखल केलेले गुन्हे बिनशर्त मागे घ्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे.

close