दरोड्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला

November 12, 2012 2:33 PM0 commentsViews: 3

12 नोव्हेंबर

नाशिकमध्ये ऐन दिवाळीतच दरोड्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. लक्ष्मीपूजनाच्या पार्श्वभूमीवर व्यापार्‍यांच्या घरी रात्री दरोडा टाकण्याच्या उद्देशानं चोरट्यांनी मोठं प्लॅनिंग केलं होतं. ही गोपनीय माहिती पोलिसांनी संकलित करून या चोरट्यांच्या अड्‌ड्यावर छापा टाकला. त्यानंतर सातजण हा दरोडा टाकणार असल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांनी धाड टाकून त्यांच्यातल्या चौघांना अटक केली तर तिघेजण फरार आहेत. त्यांच्याकडून दोन बंदुका, एक चॉपर आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलंय. अटक केलेल्या आरोपींमधला एकजण आर्मीचा माजी अधिकारी आहे, तोच या प्लॅनचा मास्टमाईंड आहे. ऐन दिवाळीत पोलिसांनी दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला म्हणून नाशिकरांनी सुटकेचा श्वास टाकला आहे.

close