लाहेरी हत्याकांडाचा मास्टरमाईंड शेखर गौडाची शरणागती

November 10, 2012 9:51 AM0 commentsViews: 7

10 नोव्हेंबर

दक्षिण गडचिरोली नक्षलींचा म्होरक्या आणि डिसेंबर 2009 च्या लाहेरी हत्याकांडाला जबाबदार असलेला शेखर गौडा ऊर्फ चंद्रन्ना यानं पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे. पत्नी विजयाअक्का सह त्यानं शरणागती पत्करलीय. शेखर गौडा हा नक्षलवाद्यांचा नेता होता. त्यानं आत्तापर्यंत अनेक मोठ्या कारवायांचं नेतृत्व केलं होतं. त्याच्या शरणागतीनं नक्षलवाद्यांच्या चळवळीला मोठा धक्का बसला आहे. आंध्र प्रदेशातील करीमनगरमध्ये त्यानं शरणागती पत्करलीय.चंद्रन्नाने अंतर्गत मतभेदामुळे शरणागती पत्करल्याचं बोललं जातंय.

close