इंग्लंडला धूळ चारत भारताची विजयी सलामी

November 19, 2012 11:32 AM0 commentsViews: 4

19 नोव्हेंबर

अहमदाबाद टेस्टमध्ये भारतानं इंग्लंडवर 9 विकेटनं दणदणीत विजय मिळवला आहे. पहिली टेस्ट जिंकत सिरीजमध्ये 1-0 ची आघाडी घेतली आहे. प्रग्यानं ओझा आणि पुजारा भारताच्या या विजयाचे शिल्पकार ठरले आहेत. पुजाराच्या डबल सेंच्युरीच्या जोरावर भारतानं पहिल्या इनिंगमध्ये 521 रन्सचा डोंगर उभा केला होता. याला उत्तर देताना इंग्लंडची पहिली इनिंग अवघ्या 191 रन्सवर ऑलआऊट झाली आणि त्यांच्यावर फॉलोअनची नामुष्की ओढावली. दुसर्‍या इनिंगमध्ये कुकनं एकाकी लढा दिला आणि इंग्लंडनं 406 रन्स करत 76 रन्सची आघाडी घेतली. पण विजयाचे हे माफक आव्हान भारतानं 1 विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केलं. पुजारानं दुसर्‍या इनिंगमध्ये नॉटआऊट 41 रन्स केले. भारतातर्फे प्रग्यान ओझानं सर्वाधिक 9 विकेट घेतल्या.

close