खंडकरी शेतकर्‍यांच्या 50 वर्षांच्या लढ्याला यश

November 12, 2012 2:40 PM0 commentsViews: 30

12 नोव्हेंबर

पन्नास वर्षांपासून लढा देत असलेल्या खंडकरी शेतकर्‍यांना शेती महामंडळाच्या जमीन वाटपाला श्रीरामपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरूवात झाली आहे. तीन जिल्ह्यातली सुमारे 23 हजार एकर जमीन खंडकरी शेतकर्‍यांना दिली जाणार आहे. शेती महामंडळाच्या कर्मचार्‍यांनाही उघड्यावर न सोडण्याचं आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलंय. इंग्रजांच्या काळात खाजगी साखर कारखान्यांना खंडानं दिलेली जमीन राज्य सरकारनं 1963 साली अधिगृहीत केली. तेव्हापासून जमिनीचे मालक असलेले शेतकरी आपली जमीन परत मिळावी यासाठी भांडत होते. आज पन्नास वर्षांनंतर या लढ्याला यश आलंय. आणि शेती महामंडळाच्या असलेल्या जमिनींपैकी 23 हजार एकर जमीन वाटण्याचा शुभारंभ आज श्रीरामपूरमध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अजितदादा पवार, राधाकृष्ण विखे, बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत करण्यात आलंय. प्रातिनिधिक स्वरूपात काहीजणांना आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सातबारा उतारा देण्यात आला. खंडक-यांना जमीन मिळतेय, कामगारांनाही न्याय देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

close