टू जी स्पेक्ट्रमची आकडेवारी खोटी -सिब्बल

November 16, 2012 4:47 PM0 commentsViews: 6

16 नोव्हेंबर

2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याच्या आकडेवारीवरून सरकारनं कॅगला पुन्हा एकदा फटकारलं आहे. 2 जी स्पेक्ट्रमच्या लिलावात 1 कोटी 76 लाख रुपयांचं नुकसान झालंय. ही कॅगची आकडेवारी खोटी आहे असं दूरसंचार मंत्री कपील सिब्बल यांनी म्हटलं आहे. लिलाव प्रक्रियेवर आरोप करून कॅगनं सोन्याची अंडी देणारी कोंबडीच मारून टाकल्याचं सिब्बल यांनी म्हटलंय. नुकत्याच झालेल्या 2 जी स्पेक्ट्रमच्या फेर लिलावाचंही त्यांनी समर्थन केलं आहे.

close