उसाला 2,500 रुपयांचा दर शेतकरी संघटनांना अमान्य

November 19, 2012 11:42 AM0 commentsViews: 37

19 नोव्हेंबर

ऊस दराच्या प्रश्नाचा तिढा अजूनही कायम आहे. रविवारी सरकारनं उसाला 2500 रुपयांचा पहिला हप्ता देण्याचा निर्णय घेतला पण हा निर्णय शेतकरी संघटनांना मान्य नाहीत. 21 तारखेला सांगलीत होणार्‍या ऊस परिषदेला तिन्ही आंदोलकांना शेतकर्‍यांच्या संघटना एकत्र येत असल्यानं त्याचा धसका घेऊन साखर कारखानदारांनी घाई घाईने ऊस दर जाहीर केले आहे. त्यात पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांतील कारखांदारांनी 2300 रुपये दर तर सांगली, सातारा आणि कोल्हापुर जिल्ह्यातील कारखांदारांनी 2500 दर जाहीर केलाय. पण हे दर आपल्याला मान्य नाही असे शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी सांगितले. योग्य दर मिळाल्याशिवाय ऊस वाहतूक आणि कारखान्यातील साखर बाहेर पडू दिली जाणार नाही असा इशाराही रघुनाथदादा पाटील यांनी दिला आहे. तर खासदार राजू शेट्टी यांनीही रघुनाथ दादा पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. पुणे, सोलापूर आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांमध्ये 2300 रुपयांच्या खाली भाव देणार्‍या साखर कारखान्याविरुद्ध आंदोलन सुरुच राहणार असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी सांगितलं आहे.

close