पनवेल इस्टेट एजंट हत्याकांड अंधश्रद्धेतून ;एकाला अटक

November 19, 2012 11:55 AM0 commentsViews: 70

19 नोव्हेंबर

रायगड जिल्ह्यातल्या पनवेलमधल्या शिरवली गावात पाटील फार्महाऊसवरील चार इस्टेट एजंटच्या हत्येप्रकरणी नवी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने रसायनीच्या मोहपाड्यातून एकाला अटक केली आहे. चंद्रकांत वाघमारे उर्फ धर्म बाबा असं या व्यक्तीचं नाव आहे. अंधश्रद्धेतून ही घटना घडल्याचा पोलिसांना संशय आहे. दत्ता पाटील यांच्या फार्महाऊसवर 14 तारखेला चार जणांचे मृतदेह आढळले होते. पैशांचा पाऊस पडेल या अंधश्रध्देपोटी ही हत्या झाली होती. यामध्ये नितीन जोशी ,बलाराम टोपले ,रामदास पाटील आणि प्रीतम घरत ह्या चौघांची हत्या करण्यात आली होती. पैसा दुप्पट करण्याच्या हव्यासापोटी आपलाच साथीदार चंद्रकांत वाघमारे उर्फ धर्म बाबा यांच्या सांगण्यावरून लाखो रूपये या चौघांनी फार्म हाऊस वर आणले मात्र या हत्येचा कट रचणार्‍या वाघमारेने संधी साधत चौघांची हत्या केली. चौघांना भरपूर नशा करायला लावून बंदुकीच्या साहाय्याने तिघांना गोळी मारली आणि एकाला दगडाने ठेचून मारण्यात आलं असं पोलिसांनी सांगितलं आहे. या हत्याकांडाचा तपास पोलिसांचे चार युनिट करत होते. तरीही चौघांची हत्या एकाचवेळी होऊ शकत नाही या हत्याकांडामध्ये अन्य साथीदार असल्याचं बलराम टोपले यांचे भाऊ दत्ता टोपले यांचे म्हणणं आहे.

close