’26/11च्या हल्ल्यात लढणार्‍या 2 कमांडोंकडे सरकारचं दुर्लक्ष’

November 22, 2012 9:52 AM0 commentsViews: 4

22 नोव्हेंबर

26/11 च्या मंुबईवर झालेल्या हल्ल्यावेळी अतिरेक्यांशी मुकाबला केलेल्या एनएसजी कमांडोजवर अन्याय झाला असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केलाय. माजी एनएसजी कमांडो सुरिंदर सिंग यांच्यावर हा अन्याय झाल्याचा दावा केजरीवाल यांनी केलाय. सुरिंदर हे कारवाईच्या वेळी जखमी झाले होते, मेडिकली अनफिट असल्यामुळे सुरिंदर यांना नोकरीतून वगळण्यात आले होते. त्यानंतर सरकारनं उपचाराचा खर्चही दिला नाही असा दावा केजरीवाल यांनी केलाय. तर केंद्र सरकारने यांचं ट्विटरद्वारे त्वरित उत्तर दिलंय. सिंग यांना 31 लाख रूपये देण्यात आले असून महिन्याला 25 हजार रूपये पेंशन दिलं जाते असं सरकानं म्हटलंय. तर 31 लाखरूपये हे सरकारनं 11 जणांना दिलेली आहे. एकट्या सुरिंदर सिंगला दिलेली नाही. सुरिंदरला त्यातले फक्त 2.5 लाख रुपये मिळाले. त्याचबरोबर महिन्याला 25 हजार रुपये दिले जातात असं सरकार सांगतंय पण सरकारनं ते सिद्ध करुन दाखवावं असं आव्हानंही अरविंद केजरीवाल यानी दिलंय.

close