एफडीआयला पाठिंब्यासाठी पंतप्रधानांची मोर्चेबांधणी

November 16, 2012 5:29 PM0 commentsViews: 6

16 नोव्हेंबर

एफडीआयच्या मुद्द्यावर पाठिंबा मिळवण्यासाठी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज त्यांनी मित्रपक्षांसाठी स्नेह भोजनाचं आयोजन केलंय. तर उद्या विरोधकांसाठी डिनर ठेवण्यात आलंय. रिटेलमधल्या FDI वर मतदानासह चर्चा करण्याची नोटीस सीपीएमनं दिलीय. ममता बॅनर्जी यांनी सुद्धा अशाच प्रकारची नोटीस देण्याची शक्यता आहे. सरकारच्या निर्णयाचा विरोध करणार असल्याचं आणि त्यासाठी सर्व पक्षांशी चर्चा करून रणनीती आखणार असल्याचं भाजपनं स्पष्ट केलंय.

close