संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची गोंधळाने सुरूवात

November 22, 2012 10:08 AM0 commentsViews: 7

22 नोव्हेंबर

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सुरूवात गोंधळानं झालीय. एफडीआयच्या मुद्यावर 184 नुसार चर्चेची मागणी केली. तर बसपा आणि समाजवादी पार्टी यांनी एससी आणि एसटी कोटा विधेयकावरुन गदारोळ घातला त्यामुळे संसदेची दोन्ही सभागृह उद्यापर्यंत तहकूब करण्यात आली. दरम्यान, पुरेशा संख्याबळाच्या अभावी तृणमूल काँग्रेसचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला गेला आहे. अविश्वास प्रस्ताव मांडण्यासाठी आवश्यक असलेले 50 खासदार तृणमूलकडे नसल्यानं सभापतींनी हा प्रस्ताव फेटाळला. दरम्यान, आज दोन्ही सभागृहात गदारोळ झाल्यानंतर सोमवारी सर्वपक्षीय बैठक घेण्याचं आश्वासन सरकारनं दिलंय. संसदीय कामकाजमंत्री कमलनाथ यांनी हे आश्वासन दिलं. याच बैठकीत कुठल्या नियमांखाली ही चर्चा व्हावी याचा निर्णय होणार आहे.

थेट परकीय गुंतवणुकीच्या मुद्द्यावर कुठल्या राजकीय पक्षाची काय भूमिका आहे ?भाजप :भूमिका : एफडीआयवर नियम 184 अंतर्गत चर्चा करून मतदान घ्यावंउद्देश : सरकारकडे पुरेसं संख्याबळ नसल्यामुळे सरकार अडचणीत येईल- समाजवादी पक्ष, धर्मनिरपेक्ष जनता दल यासारख्या पक्षांनी सरकारशी छुपी युती केली असेल तर तेही उघडे पडतील

संयुक्त जनता दल भूमिका : एफडीआयवर सभागृहात चर्चा व्हावी. कुठल्या नियमाअंतर्गत घ्यायची हे संसदेच्या कामकाज सल्लागार समिती ठरवेलउद्देश : कामकाज सल्लागार समितीत सत्ताधारी पक्षांचं बहुमत असतं. – त्यातून भाजपलाही गर्भित इशारा प्रत्येक वेळी आम्ही तुमची टोकाची मतं लादून घेणार नाही, असा भाजपला गर्भित इशारा

तृणमूल काँग्रेस – अविश्वासदर्शक ठरावाची तृणमूल काँग्रेसची नोटीस फेटाळण्यात आली- यामुळे पक्षानं सरकारविरोधात जाऊन टोकाची आणि थेट भूमिका घेतल्याचं चित्र निर्माण झालं

डावे पक्षभूमिका : एफडीआयवर नियम 184 अंतर्गत चर्चा करून मतदान घ्यावंउद्देश : एफडीआयचं धोरण देशविरोधी असल्याचं डाव्यांना वाटतं. त्यामुळे ते सरकारला रोखू इच्छितात

समाजवादी पक्ष भूमिका : एफडीआयवरून 193 किंवा 184 यापैकी कुठल्याही नियमाअंतर्गत चर्चा व्हावी उद्देश : काँग्रेस आणि भाजप या दोघांनाही आपण त्यांच्याच सोबत आहोत, असं ते भासवताहेत

बहुजन समाज पक्ष भूमिका : कुठल्या नियमाअंतर्गत चर्चा घ्यायची, हा सरकारचा अधिकारउद्देश : सरकारसोबत असल्याचे संकेत त्यांच्या या भूमिकेतून मिळत आहेत

close