तेरणा कारखान्यावर बँकेची जप्तीची कारवाई

November 24, 2012 7:49 AM0 commentsViews: 7

24 नोव्हेंबर

उस्मानाबाद इथल्या तेरणा साखर कारखान्यावर जिल्हा बँकेनं जप्तीची कारवाई केली आहे. कारखान्यावर 180 कोटींची थकबाकी असल्यानं बँकेनं ही कारवाई केली गेली आहे. त्याचबरोबर कारखाना चालवण्यासाठी भाडेतत्वावर देण्याचा निर्णयही बँकेनं घेतला आहे. शिवसेनेचे आमदार ओमराजे निंबाळकर यांच्या ताब्यात सध्या हा कारखाना आहे. गेल्या वर्षभरापासून पगारही न दिल्यानं कामगारांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय.

close