पोलिसांच्या गोळीबारात आंदोलक जखमी

November 15, 2012 12:43 AM0 commentsViews: 3

15 नोव्हेंबर

पश्चिम महाराष्ट्रात ऊस दराच्या आंदोलनाचा उद्रेक झाला आहे. सांगली जिल्ह्यातल्या आष्टा इथं पोलिसांच्या गोळीबारात एक आंदोलक जखमी झाला आहे. आष्टा गावात ऊस दरासाठी आंदोलन करणार्‍या 5 कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली होती. या कार्यकर्त्यांना पोलिसांनी बेदम मारहाण केली असा आरोप करत आक्रमक शेतकर्‍यांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमधे धुमचक्री झाली. यावेळी पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी गोळीबार केला. या गोळीबारात प्रवीण पाटील हा तरुण जखमी झालाय.

close