सिंचनावरील श्वेतपत्रिका 2 ते 3 आठवड्यात

November 22, 2012 10:32 AM0 commentsViews: 8

22 नोव्हेंबर

राज्यातील सिंचनावरली श्वेतपत्रिका येत्या दोन ते तीन आठवड्यात काढणार असल्याची माहिती राज्याचे अतिरिक्त ऍडव्होकेट जनरल दारियस खंबाटा यांनी दिली आहे. खंबाटा यांनी आज मुंबई हायकोर्टात याबद्दल ग्वाही दिली आहे. प्रवीण वाटेगावकर यांनी दाखल केलेल्या सिंचन घोटाळ्यासंदर्भातील याचिकेवर कोर्टात सुनावणी दरम्यान श्वेतपत्रिका कधी काढणार असा विचारला असता खंबाटा यांनी ही माहिती दिली. लवकरच राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. राज्य सरकारनेही हिवाळी अधिवेशना अगोदरच श्वेतपत्रिका काढली जाणार असल्याचे संकेत दिले होते. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही सिंचन घोटाळ्यातील सत्य जनतेसमोर यावं यासाठी श्वेतपत्रिका काढावीच असं स्पष्ट मत व्यक्त केलं होतं.

close