ऊस दरासाठी तीनही शेतकरी संघटना येणार एका छताखाली

November 17, 2012 9:47 AM0 commentsViews: 35

17 नोव्हेंबर

पश्चिम महाराष्ट्रात ऊस दराच्या आंदोलन सुरु असून आता सांगली मध्ये 21 नोव्हेंबरला होणार्‍या ऊस परिषदेच्या व्यासपीठावर 3 संघटनेचे नेते एकत्र येणार आहेत. शरद जोशी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि रघुनाथदादा पाटील यांना ऊस परिषदेचे आमंत्रण दिलं आहे. शरद जोशी, सदाभाऊ खोत, प्रदीप पाटील या 3 शेतकरी संघटनांच्या नेत्यांची नुकतीच भेट झाली. राजू शेट्टी आणि रघुनाथ पाटील यांनी हे आमंत्रण स्विकारलंय. आणि ऊस परिषदेला हजर राहणार असल्याचे कळवले आहे. आता राजू शेट्टी, शरद जोशी आणि रघुनाथ पाटील ऊस परिषदेला येणार असल्याने परिषदेमध्ये आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे.

close