पनवेलच्या फार्महाऊसमध्ये चौघांची हत्या

November 15, 2012 1:16 AM0 commentsViews: 16

15 नोव्हेंबर

रायगड जिल्ह्यातल्या पनवेलमधल्या शिरवली गावात चार इस्टेट एजंटची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महाड इथल्या एका जमिनीचा कोट्यवधींचा व्यवहार करण्यासाठी हे चौघे आणि इतर काही लोक एकत्र आले होते. मात्र सौद्यावरून त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. आणि त्यातूनच ही हत्या झाली आहे. मृत पावलेल्यांमध्ये पेणघर, मोर्बे आणि पनवेल तालुक्यातल्या नितीन जोशी, रामदास पाटील, बाळाराम टोपले आणि प्रीतम घरत यांचा समावेश आहे. यातल्या तिघांची हत्या गोळी घालून करण्यात आलीय. तर एकाला दगडानं ठेचून मारण्यात आलंय. मरण पावलेल्यांपैकी एकाच्या हातात पिस्तूल सापडलंय. दोन मृतदेह फार्महाऊसमध्ये सापडले तर दोन मृतदेह फार्महाऊसबाहेर सापडले. पनवेल बाजार समितीचे उपसभापती दत्ता पाटील यांच्या मालकीच्या फार्महाऊसवर ही घटना घडली. ही घटना मंगळवारी घडली असून बुधवारी उघडकीला आली. पनवेल पोलीस स्टेशनमध्ये अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांच्या स्पेशल ब्रांचमार्फत तपास सुरू आहे.

close