शरद पवारांनी शेतकर्‍यांची माफी मागावी :शेतकरी संघटना

November 22, 2012 10:40 AM0 commentsViews: 67

22 नोव्हेंबर

ऊस दरासाठीचं आंदोलन यापुढेही सुरूच राहणार असल्याचं तिन्ही शेतकरी संघटनांनी जाहीर केलं आहे. उसाची पहिली उचल 3 हजार रुपये मिळावी यासाठी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी सांगलीत झालेल्या ऊस परिषदेत केला. आंदोलनाबाबत जातीवाचक वक्तव्य केल्याबद्दल पवारांनी शेतकर्‍यांची माफी मागावी अशी मागणी शेतकरी संघटनेनं केली. वसवडे गोळीबाराची सीबीआय चौकशी करावी अशीही मागणी यावेळी करण्यात आली. तसंच यासंदर्भात 14 राज्यातील शेतकरी पंतप्रधानांना साकडं घालणार आहेत आणि निर्णय होत नाही तोपर्यंत राजघाटावर आंदोलन करतील असा इशारा शरद जोशी यांनी दिला आहे. दरम्यान याच सभेत प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल सदाभाऊ खोत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या ऊस परिषदेसाठी शरद जोशी, रघुनाथ पाटील, सदाभाऊ खोत हे शेतकरी संघटनांचे नेते एका व्यासपीठावर आले. भाजप नेते पाषा पटेल, शिवसेना नेते लक्ष्मण वडले हेही यावेळी उपस्थित होते. मात्र सांगली जिल्हा बंदीमुळे खासदार राजू शेट्टी उपस्थित राहू शकले नाहीत.

close