भारताची पहिली इनिंग 327 रन्सवर ऑलआऊट

November 24, 2012 11:30 AM0 commentsViews: 5

24 नोव्हेंबर

मुंबई टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडनं भारताला दमदार उत्तर दिलंय. भारताची पहिली इनिंग 327 रन्सवर ऑलआऊट झाली. याला उत्तर देताना इंग्लंडनं दुसर्‍या दिवस अखेर 2 विकेट गमावत 178 रन्स केले आहेत. कॅप्टन ऍलिस्टर कुक 87 तर केविन पीटरसन 62 रन्सवर खेळत आहे. इंग्लंड अजून 149 रन्सनं पिछाडीवर आहे. इंग्लंडची सुरुवात खराब झाली. प्रग्यान ओझानं निक कॉम्प्टन आणि जोनाथन ट्रॉटची झटपट विकेट घेत इंग्लंडला धक्का दिला. ट्रॉटला भोपळाही फोडता आला नाही. पण यानंतर कुक आणि पीटरसननं इंग्लंडची इनिंग सावरली.

close