पाटण्यामध्ये छटपूजेच्या वेळी चेंगराचेंगरीत 18 जणांचा मृत्यू

November 19, 2012 5:20 PM0 commentsViews: 5

19 नोव्हेंबर

पाटण्यामध्ये अदालतगंज भागातल्या गंगा घाटवर छटपूजेदरम्यान चेंगराचेंगरी झाली. त्यात 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. जखमींना पाटणा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं आहे. छटपूजेनंतर लोक परतत होते. त्यावेळी अति गर्दीमुळे बांबूचा ब्रीज कोसळला आणि ही दुर्घटना घडली. मोठ्या गर्दीला हाताळण्यासाठी पोलिसांनी योग्य नियोजन केलं नसल्याचा आरोप होतोय. गंगा घाटवर दरवर्षी छटपूजेदरम्यान प्रचंड गर्दी होते.

close