सीबीआय प्रश्नी राम जेठमलानींचा भाजपला घरचा अहेर

November 24, 2012 1:00 PM0 commentsViews: 2

24 नोव्हेंबर

भाजपचे नेते राम जेठमलानी यांनी पुन्हा एकदा पक्षाला घरचा अहेर दिला आहे. सीबीआय संचालकांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं चुकीचं असल्याचं स्पष्ट करत पक्षाचा विरोध खोडून काढला आहे. तसेच जेठमलानी यांनी आपलं नाराजी पत्र नितीन गडकरींना लिहिलं आहे. रणजीत सिन्हा यांची सीबीआय संचालकपदी नियुक्ती स्थगित करावी, अशी मागणी भाजपनं पंतप्रधानांकडे केली आहे. पण पंतप्रधानांनी भाजपची ही मागणी पूर्णपणे फेटाळून लावली आहे. नियमानुसार ही नियुक्ती केल्याचं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं आहे.

close