शिवतीर्थावर बाळासाहेबांच्या स्मारकाला राष्ट्रवादीचा पाठिंबा

November 22, 2012 2:16 PM0 commentsViews: 11

22 नोव्हेंबर

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कमधल्या स्मारकाला आता भाजपपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनेही पाठिंबा दिला आहे. मुंबई महापालिकेच्या विशेष शोक सभेत प्रस्तावाच्या भाषणादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक धनंजय पिसाळ यांनी बाळासाहेबांच्या शिवाजी पार्कवरील स्मारकाच्या मागणीला पाठिंबा दिला. तर मुंबई महापालिकेतील काँग्रेस नगरसेविका नयना जोशी यांनी बाळासाहेबांचं नाव दादर स्टेशनला द्यावं अशी मागणी केलीय. याशिवाय शिवडी- न्हावाशेवा सिलिंकला बाळासाहेबांचं नाव द्या, अशी मागणी मुंबई महापालिकेतील सभागृह नेते यशोधर फणसे यांनी केली आहे.

close