बाळासाहेब ठाकरे यांचं निधन

November 17, 2012 2:44 PM0 commentsViews: 757

17 नोव्हेंबर

बाळ केशव ठाकरे..मात्र जग त्यांना ओळखतं ते बाळासाहेब ठाकरे या नावानं. गेली 41 वर्ष या नावानं मराठी मनावर गारुड केलंय. त्यांच्या शब्दावर जीव ओवाळून टाकायला शेकडो तरुण तयार असतात. हे तुफान आज शांत झालंय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं आहे. ते 86 वर्षांचे होते. दुपारी साडेतीन वाजता त्यांनी आपल्या राहत्या घरी मातोश्रीवर अखेरचा श्वास घेतला. दीर्घ आजारानं त्यांचं निधन झालंय. गेल्या आठवड्याभरापासून बाळासाहेब आजाराशी लढा देत होते मात्र आज अखेर बाळासाहेब नावाचं झंझावात वादळ शमलंय. लाखो शिवसैनिकांचे दैवत बाळासाहेब आज सगळ्यांना सोडून गेले आहे. मातोश्रीबाहेर शिवसैनिकांनी एकच गर्दी केली. हजारो शिवसैनिकांना यावेळी अश्रू अनावर झाले नाहीत. महाराष्ट्र पोरका झाला अशी भावना सगळे जण व्यक्त करत आहेत. अनेक राजकीय नेत्यांनी मातोश्रीवर धाव घेतलीय. उद्या सकाळी सात वाजल्यापासून शिवाजी पार्कवर बाळासाहेबाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येणार आहे. तमाम शिवसैनिकांना शांत राहण्याचं आवाहन शिवसेनेकडून करण्यात आलं आहे.

बाळ केशव ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक वादळ…शिवसेनेचे संस्थापक आणि शिवसेनाप्रमुख असलेल्या बाळासाहेबांचा जन्म 23 जानेवारी 1926 ला पुण्यात झाला. त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात 1950ला ते फ्री प्रेस जर्नलमध्ये व्यंगचित्रकार म्हणून झाली. या काळात त्यांची राजकीय व्यंगचित्र खूपच गाजली. पुढे वैशिष्ट्य ठरलेल्या त्यांच्या तिरकस भाषणशैलीचं मुळ त्यांच्या या भुतकाळात आहे असं म्हटल्यास ते वावगं ठरू नये. बाळासाहेबांचे वडील केशव सीताराम ठाकरे म्हणजेच प्रबोधनकार ठाकरे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतलं एक मोठं नाव. त्यामुळे पुरोगामित्व आणि सामाजिक जाणिवेचा वसा त्यांना घरातूनच मिळाला. शिवसेनेच्या स्थापनेपुर्वी त्यांच्या जीवनातला एक महत्वाचा टप्पा म्हणून मार्मिक या साप्ताहिकाचा उल्लेख करावा लागेल. 1960 साली बाळासाहेबांनी सुरू केलेल्या या व्य्ंागचित्र साप्ताहिकातलं ' वाचा आणि स्वस्थ बसा ' हे सदर तर त्या काळी खूपच गाजलं. या साप्ताहिकानं एक वेगळंच राजकीय वातावरण तयार केलं. 19 जून 1966 साली भूमिपुत्रांच्या न्याय हक्कांसाठी शिवसेनेची स्थापना झाली. 'बजाव पुंगी हटाव लुंगी' ही शिवसेनेची घोषणाही बरीच गाजली.

सुरूवातीला शिवसेनेनं दाक्षिणात्यांना टार्गेट केलं. अनेक कंपन्या आणि व्यवसायात असलेलं दाक्षिणात्यांचं प्राबल्य आणि त्यामुळे मराठी माणसाला होत असलेला त्रास हा प्रमुख मुद्दा शिवसेनेनं हिरीरीनं मांडला. सुरूवातीच्या काळात एक सामाजिक संघटना असलेल्या शिवसेनेचं पुढे राजकीय पक्षात रुपांतर झालं. 1985 नंतरच्या काळात हिंदुत्व आणि राष्ट्रवादाची भूमिका प्रखर करत शिवसेनेनं राजकारणावर भर दिला. 1995 ते 99 हा काळ बाळासाहेबांच्या राजकीय कारकिर्दीतला महत्वाचा काळ म्हणावा लागेल. शिवसेना भाजप युतीचं सरकार महाराष्ट्र विधानसभेत सत्तेवर आलं. आणि बाळसाहेब होते या सरकारचे रिमोट कंट्रोल. शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेबांची अनेक वक्तव्यं वादग्रस्त ठरली. मग त्यात दाक्षिणात्य, गुजराती, बिहारी यांना केलेला विरोध असो, किंवा उघडपणे केलेली हिटलरची प्रशंसा, बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी केलेलं समर्थनाचं विधान असो वा अफझल गुरूच्या संदर्भात तत्कालीन राष्ट्रपती कलाम यांच्यावर केलेली टीका असो बाळासाहेब कायम त्यांच्या अशा वक्तव्यामुळे चर्चेत राहिले. त्यांच्या शब्दांना तलवारीसारखी धार होती. म्हणूनच त्यांच्या वक्तृत्वानं आणि लेखणीनं अनेकांना घायाळ केलं.लाखो तरुणांना शिवसेनेच्या झेंड्याखाली आणलं… महाराष्ट्राचा गेल्या पाच दशकांचा इतिहास लिहायचा झाल्यास बाळासाहेब ठाकरे या आठ अक्षरांना टाळून पुढे जाता येणार नाही. गेल्या पाच दशकात बाळासाहेबांनी अनेक वादळांचा सामना केला. अनेक वाद उभे केले.

बाळासाहेबांचा जीवनप्रवास

जन्म – 23 जानेवारी 19261945 – फ्री प्रेसमध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू1960 – मार्मिक साप्ताहिक सुरू19 जून 1966 – शिवसेनेची स्थापना, दाक्षिणात्यांविरोधात आंदोलन तीव्र 14 ऑगस्ट 1967 – शिवसेनेनं पहिल्यांदा ठाणे महापालिका ताब्यात घेतली26 मार्च 1968 – शिवसेनेचा मुबंई महापालिकेवर भगवा1970 – वामनराव महाडिक हे शिवसेनेचे पहिले आमदार विधानसभेवर 1973 – सुधीर जोशी मुंबईच्या महापौरपदी1977 – दादरला सेनाभवनाचं उद्घाटन1986 – पहिल्यांदाच हिंदुत्वाचा मुद्दा मांडला23 जानेवारी 1989 – शिवसेनेचं मुखपत्र सामना सुरू 1989 – लोकसभा निवडणुकीसाठी सेना-भाजप युती 1990 – पाकिस्तानी क्रिकेटपटूंना विरोध, शिवसैनिकांनी वानखेडेवर पीच उखडलं 1991 – छगन भुजबळ शिवसेनेतून बाहेर1992 – अयोध्येतल्या राम मंदिर उभारणीच्या आंदोलनाला ठाम पाठिंबा1995 – विधानसभेवर भगवा, सेना-भाजप सत्तेत मनोहर जोशी शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्रीसप्टेंबर 1996 – मीनाताई ठाकरेंचा मृत्यू1999 – केंद्र सरकारमध्ये सहभाग, 13 व्या लोकसभेत शिवसेनेचे 15 खासदारजुलै 1999 – निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार बाळासाहेबांना मतदान करायला आणि निवडणूक लढवायला 5 वर्षांची बंदी2007 – बंदी उठल्यानंतर मुंबई महापालिका निवडणुकीत बाळासाहेबांनी पहिल्यांदा मतदान केलं 2002 ते 2004 – लोकसभेच्या सभापतीपदी शिवसेनेचे मनोहर जोशी 2005 – नारायण राणेंना शिवसेनेनं पक्षातून काढलं18 डिसेंबर 2005 – राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्याची घोषणा केली29 जानेवारी 2007 – इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत हिटलरची प्रशंसा केली2011 – बाळासाहेबांचा शेवटचा दसरा मेळावा

युतीच्या काळातले महत्त्वाचे निर्णयमोफत घरंमुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेमुंबईतले फ्लायओव्हर्सखाजगी वाहिन्यांचे दरनफ्यातल्या सरकारी तेल कंपन्यांच्या विक्रीला विरोध मुंबईतले लोंढे थांबवण्यासाठी परवाना लागू करण्याचा प्रयत्न वादग्रस्त ठरलाझुणका-भाकर केंद्रामुळे मराठी माणसाला व्यवसायभिमुख बनविण्याचा प्रयत्नक्रिकेटचे चाहते- क्रिकेटचे निस्सिम चाहते, वानखेडे स्टेडियमच्या उभारणीच्या वेळी झालेला विरोध मोडून काढला. वानखेडेला शिवसेनेचा जाहीर पाठिंबा दिला. बापू नाडकर्णी, माधव मंत्री, पॉलि उम्रीगर यांचे लोकल मधले सहप्रवासी. बाळासाहेब फ्री प्रेसमध्ये तर क्रिकेटर चर्चगेट येथील एसीसी सिमंेटमध्ये कामाला. याच लोकल प्रवासात बाळासाहेेबांनी बापू नाडकणीर्ंचा भारतीय टेस्ट टीममधला प्रवेश साजरा केला होता. त्यावेळी लोकल ट्रेन मध्ये बाळासाहेबांनी बापू नाडकर्णी यांना खास व्यंगचित्र भेट दिलं होतं. आजही ते व्यंगचिंत्र बापू नाडकर्णी यांनी जपून ठेवलंय.

शिवसेनेतून बाहेर पडलेले महत्त्वाचे नेते छगन भुजबळ गणेश नाईक संजय निरूपम नारायण राणे राज ठाकरे

close