बाळासाहेबांच्या अस्थिकलश दर्शनासाठी सेनाभवनात

November 20, 2012 10:28 AM0 commentsViews: 2

20 नोव्हेंबर

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अस्थिकलश आज शिवसेना भवनात आणण्यात आला. उध्दव ठाकरे यांनी मातोश्रीवरून अस्थिकलश सेना भवनात आणला. एकूण 80 अस्थिकलश तयार करण्यात आले असून राज्यभरातून आलेल्या जिल्हाध्यक्षांकडे ते सुपुर्द केले जाणार आहेत. शिवसेनेच्या जिल्हा कार्यालयांमध्ये अस्थिकलश अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. तसंच शिवसेनाभवनात उद्या आणि परवा अस्थिदर्शन घेता येईल. आणि त्यानंतर 23 नोव्हेंबरला देशातल्या प्रमुख नद्यांमध्ये अस्थिविसर्जन केलं जाणार आहे.

close