अमरावतीत स्कूल व्हॅनला अपघात, 4 विद्यार्थी ठार

November 27, 2012 10:22 AM0 commentsViews: 4

27 नोव्हेंबर

अमरावतीतील नवसारी रोडवर एसटी बस आणि स्कूल व्हॅनच्या धडकेत प्राथमिक शाळेतल्या 4 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर दहा मुलं गंभीर जखमी आहे. जखमी विद्यार्थ्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अरुणोदय इंग्लिश प्रायमरी स्कूलचे 2 आणि पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या एका विद्यार्थ्याचा यात समावेश आहे. हे सर्व विद्यार्थी अमरावती जवळच्या सर्जापूर कुंड गावात राहणारे होते.पोलीस आयुक्तांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहे. क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची व्हॅनमधून वाहतूक केली जात होती. पोलिसांनी एसटी बस चालक आणि स्कूल बस चालकाला अटक केली आहे.

close