138 कोटींत मंत्रालयाचं नुतनीकरण

November 22, 2012 5:11 PM0 commentsViews: 2

22 नोव्हेंबर

महाराष्ट्राच्या कारभाराचा गाडा जिथून हाकला जातो त्या मंत्रालयाच्या इमारतीला 21 जुनला भीषण आग लागली होती. या अग्नितांडवात इमारतीचे 3 मजले जळून भस्म झाले होते तर 2 दोन जणांचा मृत्यू झाला होता. आगीतून सावरल्यानंतर मंत्रालयाच्या मेकओव्हरचा प्रश्न ऐरणीवर आला. पण प्रश्न काही मार्गी लागत नव्हता. अखेरीस याबाबत आज सरकारनं नुतणीकरणाचा निर्णय घेतला आहे. मंत्रालयाच्या नुतनीकरणासाठीचं कंत्राट युनिटी कन्सट्रक्शनला देण्यात आलंय. युनिटी कन्स्ट्रक्शनच्या 138 कोटी रुपयांच्या निविदेला सरकारनं मंजुरी दिली आहे. येत्या 8 महिन्यात मंत्रालयाचं नुतनीकरण केलं जाणार आहे. मंत्रालयाच्या आगीत तीसरा,चौथा आणि पाचवा मजला आगीत भस्म झालाय. या तीन मजल्याचं नुतणीकरण आणि इमारतीची डागडुजी करण्यात येणार आहे.

close