अधिवेशनात सरकारला घेरण्याची भाजपची तयारी

November 20, 2012 11:39 AM0 commentsViews: 2

20 नोव्हेंबर

बुधवारपासून सुरू होणार्‍या संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी सरकारला अडचणीत आणण्यासाठी विरोधक आक्रमक झाले आहे. भाजपच्या आज झालेल्या बैठकीत एफडीआयच्या मुद्यावर मतदानाची मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एनडीएच्या आज संध्याकाळी होणार्‍या बैठकीत भाजप आपली भूमिका जाहीर करणार आहे. तर तिकडे ममता बॅनर्जी यांनीही सर्व पक्षांनी अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा देण्याचं आवाहन केलंय. तसंच सीपीएमला आमच्या प्रस्तावाला पाठिंबा द्यायचा नसेल तर त्यांनी प्रस्ताव मांडावा तृणमूल काँग्रेस त्याला पाठिंबा देईल असंही ममतांनी स्पष्ट केलं आहे.

close