गाडगीळ समितीच्या अहवालाला मुख्यमंत्र्यांचा विरोध

November 24, 2012 3:21 PM0 commentsViews: 14

24 नोव्हेंबर

कोकणात पर्यावरणाचा विकास करताना विकासाला खिळ बसू नये असं मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलंय. माधव गाडगीळ समितीच्या शिफारशी स्वीकारल्या तर कोकणचा विकास ठप्प होईल, कोकणाच्या चार जिल्ह्यातील रस्ते,रेल्वे, एअरपोर्ट बांधता येणार नाहीत असं स्पष्ट मत कस्तुरीरंगन आयोगासमोर मांडल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यात सांगितलं. हा अहवाल राजकारणी न वाचताच त्याचा अप्रचार करतायत हा गाडगीळांचा आरोप मुख्यमंत्र्यांनी फेटाळला.अनिल काकोडकर यांनी विधिमंडळामध्ये जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पावर संवाद साधला होता. तशाच प्रकारे पश्चिम घाट अहवालावर विधिमंडळामध्ये गाडगीळ यांनी संवाद साधावा या सूचनेवर आपण विचार करू असंही मुख्यमंत्री म्हणाले आहे.

close