गाझा पट्टीत अखेर शस्त्रसंधी घोषित

November 22, 2012 5:29 PM0 commentsViews: 22

22 नोव्हेंबर

इस्त्रायल आणि हमास यांच्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार रॉकेट हल्ले सुरू होते. पण या युद्धाला सध्या विराम मिळालाय. दोन्हीकडून शस्त्रसंधी घोषित क रण्यात आली आहे. पण त्यानंतर काही तासातच हमासने 5 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं असा आरोप इस्त्रायलने केला आहे. ही शस्त्रसंधी अमेरिका आणि इजिप्त यांनी घडवून आणली. या शस्त्रसंधीनुसार गाझा पट्टीत पॅलेस्टाईनच्या नागरिकांना प्रवेश करण्याचं स्वातंत्र्य मिळेल आणि इस्त्रायलकडून पॅलेस्टाईनच्या नागरिकांवर हल्ला केला जाणार नाही. मात्र इस्त्रायलचे पंतप्रधान नेतेनयाहू यांनी शस्त्रसंधीचं उल्लंघन झाल्यास त्याला चोख प्रत्यत्तर दिलं जाईल, असा इशारा दिला आहे.

close