शिवाजीपार्कवर उद्या अंत्यदर्शन

November 17, 2012 3:44 PM0 commentsViews: 5

17 नोव्हेंबर, मुंबई

उद्या म्हणजे रविवारी सकाळी आठ वाजता मातोश्रीहून बाळासाहेबांचं पार्थिव सेनाभवनकडे नेण्यात येईल. त्यानंतर बाळासाहेबांचं पार्थिव दिवसभर शिवाजी पार्कवर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

मुंबईतील सर्व ठिकाणांवरुन शिवाजी पार्कसाठी बसेस सोडण्यात येणार आहे. तर सेंट्रल, वेस्टर्न आणि हार्बर या तिन्ही रेल्वे मार्गांवरील मेगाब्लॉक रद्द करण्यात आले आहेत. उद्या मुंबईतील सर्व सिनेमा थिएटर्स आणि नाट्यगृह बंद राहतील.

मुंबईत कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून 20 हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. मुंबईकरांनी उद्या महत्वाचे काम असेल तरच बाहेर पडावं असं आवाहन मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी केलं आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची अंत्ययात्रा

- सकाळी 7 वाजता मातोश्री येथून शिवाजी पार्ककडे रवाना – सकाळी 9 वाजता शिवाजी पार्क येथे जनतेला अंतिम दर्शनासाठी – सायंकाळी 5 पर्यंत अंतिम दर्शन- सायंकाळी 6 वाजता मंत्राग्नी ( अंत्यसंस्कार) – अंतिम दर्शनासाठी शिवाजी पार्क येथे माँसाहेब मीनाताई ठाकरे पुतळा,समर्थ व्यायाम मंदिर येथील प्रवेशद्वारातून प्रवेश देण्यात येईल – महिलांसाठी समर्थ व्यायाम मंदिर येथून वेगळ्या लाईनची व्यवस्था करण्यात आली आहे- उद्यान गणेश येथील प्रवेशद्वारातून बाळासाहेब ठाकरे यांचे कुटुंबिय, शिवसेना नेते, विविध पक्षांचे नेते,मान्यवर मंडळी ह्यांना प्रवेश व्यवस्था करण्यात आली आहे. मान्यवरांच्या गाड्या पार्किंगची व्यवस्था वीर सावरकर मार्गावर करण्यात आली आहे- प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांच्यासाठी उद्यान गणेश येथून प्रवेश व्यवस्था करण्यात आली आहे- इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांच्या कॅमेरासाठी स्टेज उभारण्यात आले असून तसेच ओबी व्हॅन शिवाजी पार्क मैदानासमोरील बाल क्रीडा भवन येथे पार्क करण्यात याव्यात – मुंबई ,ठाणे येथील शिवसैनिकांनी तसेच शिवसेनाप्रमुखांच्या चाहत्यांनी महायात्रेला उपस्थित राहण्यासाठी शक्यतो खाजगी वाहनांचा वापर टाळावा- खाजगी बस व मोठ्या वाहनाने येणार्‍या शिवसैनिकांनी आपली वाहने वाहतूक पोलीस विभागाने सूचित केल्याप्रमाणे सेनापती बापट मार्गावर पार्क करावीत

close