कसाबवरचा 21 कोटींचा खर्च कोण देणार?

November 24, 2012 4:25 PM0 commentsViews: 43

24 नोव्हेंबर

मुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाबला 21 डिसेंबरला सकाळी साडे सात वाजता फासावर लटकावले. गेल्या चार वर्षांपासून अजमल कसाबवर तब्बल 21 कोटींचा खर्च झाला आहे. आता हा खर्च कोणी भरावा यावरून केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये 'पहले आप पहले आप' सुरू झालंय. कारण अजमल कसाबच्या सुरक्षेवर झालेला खर्च राज्य सरकारनं भरावा असं पत्र केंद्रीय गृहमंत्रालयानं राज्य सरकारला पाठवलंय. तर हा खर्च माफ करावा किंवा हा खर्च केंद्रानं उचलावा अशी मागणी राज्याचे गृहमंत्री आर .आर पाटील यांनी केली आहे. कसाबच्या सुरक्षेसाठी इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस तैनात करण्यात आले होते. त्यांचा खर्च 21 कोटी रूपये झाला आहे. 26 नोव्हेंबर 2008 रोजी अजमल कसाब आणि त्यांच्या नऊ साथीदारांनी समुद्रमार्गे येऊन ताज हॉटेल,सीएससी स्टेशन, हॉटेल लिओपॉड,नरीमन पॉईंट परीसरात हैदोस घातला होता. मात्र या हल्ल्यात शहीद तुकाराम ओंबळे यांनी जीवाची बाजी लावून कसाबला जिंवत पकडले होते. भारताच्या ताब्यात पाकिस्तान विरोधात पुरावा म्हणून कसाब हा एकमेव अतिरेकी हाती लागला होता. त्यामुळे त्याला विशेष सुरक्षेत ठेवण्यात आलं होतं. मुंबईतील आर्थर रोड कारागृहात खास सेलमध्ये कसाबला एकट्याला ठेवण्यात आलं होतं. त्याच्या सुरक्षेसाठी 26 मार्च 2009 पासून इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस तैनात करण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने कसाबची फाशी कायम ठेवली. अखेरीस शेवटचा मार्ग म्हणून कसाबने राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे दयेचा अर्ज केला होता. मात्र राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळून लावला. अर्ज फेटाळून लावल्यानंतर केंद्र सरकारने कसाबच्या फाशीच्या प्रक्रियेला सुरुवात केली. 21 नोव्हेंबरला फाशीवर लटकवण्याचं ठरलं. यासाठी पुण्यातील येरवडा कारागृहात फाशी देण्याचं तय झालं. अत्यंत गुप्तता पाळत सरकारने कोणालाही खबर न लागता सकाळी साडेसात वाजता कसाबला फासावर लटकावले. कसाबचा दफनविधी झाल्यानंतर राज्य सरकारने याची घोषणा केली. कसाबला फासावर लटकावण्यात आलं याची बातमी वार्‍यासारखी पसरली आणि देशात पुन्हा एकदा दिवाळी साजरी झाली.

असं घडलं 'ऑपरेशन X'

close