कराडमध्ये वाघ संवर्धनासाठी रॅलीचं आयोजन

November 20, 2012 12:20 PM0 commentsViews: 8

20 नोव्हेंबर

महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या खोर्‍यात व्याघ्र प्रकल्प होवू घातला असून तो लवकर कार्यान्वित व्हावा आणि सह्याद्रीच्या खोर्‍यातील वाघांसह संपूर्ण पर्यावरणाचं संरक्षण व्हावे यासाठी टीसीआरसीने मुंबई ते कराड रॅलीचे आयोजन केलं. तळकोकण अँडव्हेंचर सह्याद्रीचा वाघ वाचवा हा संदेश घेऊन मोटरसायकल रॅलीचा शुभारंभही यावेळी करण्यात आला. देशात कधीकाळी हजारोंच्या संख्येनं असणार्‍या वाघाची संख्या अवघी 1706 झाली आहे. यावेळी अतिरिक्त वन्यजीव संरक्षक ए. के. निगम आणि जेष्ठ पत्रकार कुमार केतकर उपस्थित होते. टायगर कंझरवेशन अँड रिसर्च सेंटर आणि हिरे कॉलेजच्या वतीने सेव्ह टायगर ह्या मोहिमेची सुरवात करण्यात आली. अभयारण्याच्या आत आणि आसपास राहणार्‍या लोकांमध्ये जनजागृती हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्टे आहे. धारावीतील महाराष्ट्र नेचर पार्क ते कराड अशी मोटरसायकल रॅलीची सुरवातही झाली.

close