डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची 500 भाषणं ग्रंथ रुपात भेटीला

November 27, 2012 8:23 AM0 commentsViews: 11

27 नोव्हेंबर

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 500 भाषणांचा समावेश असलेल्या 'बोल महामानवाचे' या ग्रंथाचं प्रकाशन सोमवारी पुण्यात करण्यात आलं. केंद्रीय नियोजन आयोगाचे सदस्य नरेंद्र जाधव यांनी ही भाषणं अनुवादीत आणि संपादीत केली आहेत. भारतीय संविधान दिनाचं औचित्य साधून या ग्रंथाचं प्रकाशन करण्यात आले आहे. सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायाधीश पी. बी. सावंत यांच्या हस्ते तर वनराईचे अध्यक्ष मोहन धारिया यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, दिलीप पाडगावकर, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नागनाथ कोतापल्ले हजर होते.

close