हिवाळी अधिवेशनापूर्वी श्वेतपत्रिका प्रसिद्ध होणार ?

November 26, 2012 9:57 AM0 commentsViews: 3

26 नोव्हेंबर

हिवाळी अधिवेशनापूर्वी सिंचनाची श्वेतपत्रिका प्रसिध्द होण्याचे संकेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहेत. त्यानुसार 10 डिसेंबरपूर्वी राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकत सिंचन श्वेतपत्रिका मांडली जाणार आहे. श्वेतपत्रितेला मंत्रिमंडळाची मान्यता मिळताच ती प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात फक्त औपचारिकता म्हणून सिंचन श्वेतपत्रिकेवर चर्चा केली जणार आहे अशी माहिती सुत्रांनी आयबीएन-लोकमतला दिली आहे. श्वेतपत्रिका हिवाळी अधिवेशनात न मांडता ती आधीच प्रसिद्ध करावी अशी राष्ट्रवादीची मागणी आहे. यासंदर्भात शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चाही केलीये असं समजतंय.

close