सुधारित लोकपाल विधेयक शुक्रवारी राज्यसभेत

November 20, 2012 1:09 PM0 commentsViews: 8

20 नोव्हेंबर

संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होतंय आणि अधिवेशनाच्या शुक्रवारी सुधारीत लोकपाल विधेयक राज्यसभेत मांडलं जाणार आहे अशी माहिती राज्यसभेच्या निवड समितीचे अध्यक्ष सत्यव्रत चतुर्वेदी यांनी दिली आहे. राज्यसभेच्या निवड समितीनं लोकपाल विधेयकाचा मसुदा स्वीकारला आहे. लोकायुक्ताच्या निर्मितीचा मुद्दा लोकपाल विधेयकातून वगळावा आणि राज्यांकडे द्यावा अशी शिफारस यात करण्यात आलीय. पण पंतप्रधानांचं कार्यालय लोकपालाच्या अंतर्गत आणावं असं त्यात म्हटलं आहे. निवड समितीच्या या शिफारशींबाबात उद्याच्या हिवाळी अधिवेशनात सरकार चर्चा करणार आहे.

close