गोपीनाथ मुंडेंना पुतण्या धनंजय मुंडेंकडून धक्का

November 27, 2012 1:19 PM0 commentsViews: 58

27 नोव्हेंबर

भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांना त्यांच्या गावातच त्यांचे पुतणे धनंजय मुंडे यांनी धक्का दिलाय. नाथ्रा ग्रामपंचायतीत धनंजय मुंडे यांच्या पॅनलनं 7 पैकी सात जागा जिंकून मोठा विजय मिळवला आहे. त्याचबरोबर गोपीनाथ मुंडे यांचा वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना ज्या पांघरी गावात आहे. त्या पांघरी गावची ग्रामपंचायतही गोपीनाथ मुंडे यांना गमवावी लागलीय. त्या ठिकाणी 9 पैकी 8 जागांवर धनंजय मुंडे यांच्या समर्थक पॅनलचा विजय झाला आहे. दरम्यान, परळी तालुक्यातील ग्रामपंचयतींवर आपलंच वर्चस्व असल्याचा दावा दोन्ही पक्षांकडून केला जातोय.

close