चेतेश्वर आला धावून;पहिला दिवस 6 विकेट 266

November 23, 2012 1:15 PM0 commentsViews: 5

23 नोव्हेंबर

मुंबई टेस्टमध्ये पहिल्या दिवसअखेर भारतानं 6 विकेट गमावत 266 रन्स केले. आजच्या दिवसाचा हिरो ठरला तो शतकवीर चेतेश्वर पुजारा, पुजाराच्या शानदार सेंच्युरीच्या जोरावर भारत आज 266 इतका सन्मानजनक स्कोअर करु शकला. आजच्या दिवसाची सुरुवात खराब झाली, गंभीर,सेहवाग आणि सचिन तेंडुलकर स्वस्तात आऊट झाले.तर कोहली आणि युवराज सिंग यांनीही निराश केलं. 5 विकेटवर 119 रन्स अशी भारताची अवस्था असतानाचं, पुजारानं टिच्चुन बॅटिंग करत, सेंच्युरी केली. आणि त्याला तितकीचं मोलाची साथ दिली ती ढोणी आणि रविचंद्रन आश्विनने. आश्विन 60 तर पुजारा 114 रन्सवर खेळतोय. तर अहमदाबाद टेस्टमध्ये बाहेर ठेवण्यात आलेल्या, मॉन्टी पानेसरनं आज आपली ताकद दाखवून दिली. पानेसरनं आज 4 विकेट्स घेत भारताच्या बॅटिंगला खिंडार पाडलं. पण पुजाराचा अडथळा मात्र त्याला दूर करता आला नाही.

close